Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर : बजाजनगर परिसरातील प्रताप चौक येथे आज (मंगळवार) रात्री साडेआठच्या सुमारास सिनेस्टाईल हल्ला घडला. तिघा-चौघांनी मिळून एका युवकावर चाकूने वार केले. यावेळी आरोपींनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला असता पिस्तुलातील मॅगझिन खाली पडल्याने मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात भोळाराम शामराव कडमींचे (३२) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरात मोठी धावपळ उडाली. वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त संजय सानप, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार व वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार आरोपींनी चाकूने हल्ला करताना पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला; मात्र मॅगझिन खाली पडल्याने गोळी सुटली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे बजाजनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

