
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योजकाची तब्बल ५४ लाखांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भगवानदास आहुजा (वय ८१) यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकार?
भगवानदास आहुजा हे बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असून त्यांची वाळूज एमआयडीसी येथील ई-सेक्टरमध्ये मारुती इंटरप्राईजेस ही कंपनी आहे.
दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी आहुजा यांना एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅप संदेश आला. त्या संदेशात लिहिले होते की,
“Water Bill Update Apk या अॅपवर जाऊन आजच अपडेट करा, अन्यथा तुमचे कंपनीचे पाणी कनेक्शन कायमचे बंद होईल.”
त्यानंतर आहुजा यांनी मेसेजमध्ये दिलेले अॅप डाउनलोड केले. त्यात “१३ वर्षांसाठी १३ रुपये पेमेंट करावे लागेल” असा पर्याय दिसला. याचवेळी एका व्यक्तीने स्वतःला वॉटर ऑफिसचा अधिकारी सांगत त्यांना व्हॉट्सअॅप कॉल केला. त्याने आग्रह धरला की पेमेंट नेट बँकिंगद्वारेच करावे लागेल.
फसवणुकीची युक्ती
आहुजा यांनी सुरुवातीला अनभिज्ञता दाखवली असता, त्याच व्यक्तीने (दिव्येश जोशी नावाने ओळख सांगणारा) त्यांना मार्गदर्शन करण्याचे नाटक केले. त्याने नेट बँकिंगसंबंधीची माहिती विचारून घेतली.
यानंतर आहुजा यांचा मोबाईल अचानक काम करेनासा झाला; मेसेजेस आणि ई-मेलही बंद पडले.
पुढील दोन दिवस त्या व्यक्तीकडून वारंवार “फॉर्म खूप मोठा आहे, नेटवर्क स्लो आहे, मी अपडेट करून कॉल करतो” असे सांगण्यात आले. परंतु नंतर कोणताही कॉल आला नाही.
खात्यातून लाखोंचा गंडा
शेवटी आहुजा यांनी आपल्या मुलाला संपर्क करून बँकेत धाव घेतली. तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या दोन एफडीसह खात्यातील एकूण ५३,८१,००४ रुपये परस्पर डेबिट झाल्याचे आढळले.
पोलिसांत गुन्हा दाखल
ही बाब लक्षात येताच आहुजा यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. अखेर त्यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


