
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळूज महानगर : कोल्हापूर जिल्ह्यातील नंदिनी येथील श्री जिनसेन मठात तब्बल ३५ वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहवासात राहणारी माधुरी हत्तीण सध्या भावनिक चर्चेचा विषय ठरली आहे. हत्तीणीच्या आरोग्याच्या कारणावरून तिला गुजरातमधील वन तारा येथे हलवण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून तिच्या पुनःपाठवणीसाठी आता एक मोहीम उभी राहत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, माधुरी हत्तीणीशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे तिचा अचानक झालेला विलगीकरणाचा निर्णय मनाला चटका लावणारा ठरला आहे. विशेष म्हणजे, वन तारा हे ठिकाण अंबानी यांच्या मालकीचे असल्यामुळे ग्रामस्थांनी याविरोधात अनोखी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या जिओ सिमचे पोर्टिंग अन्य नेटवर्कमध्ये करण्याची मोहीम सुरू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर, उद्या दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान बजाजनगर येथील मोहतदेवी मंदिर परिसरात माधुरी हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि हत्तीणीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 6 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


