
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)
वाळूज महानगर – मोबाईल घेऊन दिला नाही, या कारणावरून १६ वर्षीय तरुणाने थेट खावडा डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाचे नाव अथर्व गोपाल तायडे (वय १६) असून तो मूळचा जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथील रहिवासी आहे. सध्या तो स्वातिक सिटी, साजापूर शिवार, वाळूज येथे राहत होता. तो पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता.

आईकडे मोबाईल मागितला, पण तीने नकार दिला. रागाच्या भरात अथर्वने तिसगाव येथील खावडा डोंगरावरून उडी मारली.
ही घटना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमी अवस्थेत असलेल्या अथर्वला अतुल आडे आणि स्वप्नील पवार यांनी तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर आईने फोडलेला हंबरडा हृदयद्रावक होता. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास करत आहे.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघडShare Total Views: 6 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडलेShare Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपासShare Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 9 Share
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटनाShare Total Views: 8 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५


