
वाळूज महानगर : साई रिजन्सी हाउसिंग सोसायटी, वाळूज महानगर – १ येथे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी संजय संभाळकर यांची तर सचिवपदी संदीप लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड एकमताने झाल्यामुळे सोसायटीमधील सर्वसामान्य सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नवीन कार्यकारिणी सोसायटीच्या विकासासाठी आणि रहिवाशांच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी कार्यरत राहील, असे संजय संभाळकर यांनी सांगितले. निवड झाल्यानंतर गजानन सिरसाट यांनी सर्व सभासदांचे आभार मानत, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन दिले. निवडीनंतर दोघांचेही सोसायटी सदस्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष – रंजना धोंडकर , प्रदीप पाटील , सहसचिव रत्ना भालेराव , कोषाध्यक्ष सुधाकर ढोले , सदकोषाध्यक्ष – भाऊसाहेब गवते , मार्गदर्शक – संजय मोडके , गजानन शिरसाट सदस्य रमेश शिंदे, शांतीलाल राठोड गणेश सदमस्तुल संतोष सिंग आदींची निवड करण्यात आली.यावेळी सचिन कासार,संजय भालेराव, एकमत ठोंबरे, मोर साहेब, परेश घुले, एकमत हांडे,दिनेश सोनवणे,अंकुश मालवदे,शांतीलाल द्वारकुंडे, राजू ढोले, दिनेश पाटील, नीरज ढोले, सचिन सरोदे यांचासह आदींची उपस्थिती होती.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


