April 24, 2025
00e52557-8327-4818-9121-43071edc5001

https://youtu.be/Daa7gVMYwn0?si=OE4UZW3LdIQjuRlc

न्युज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर : बजाजनगर येथे मुलांना दुचाकीवरून शाळेत सोडत असताना प्रताप चौक येथे येताच विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीचा एकमेकांना धक्का लागल्याने दुचाकीवरील पालक व तरुणांमध्ये किरकोळ वाढ झाला, तरुणाने अजून दोन मित्रांना बोलावून पालकाला बेदम मारहाण केल्याची घटना आज दि १९ रोजी सकाळी ७.१५ वाजता घडली. याप्रकरणी एक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हाइरल झाला असून वाळूज एमआयडीसी येथे गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार रतन घुगे हे ७ वर्षाचा मुलगा व ८ वर्षाच्या मुलीला दुचाकी क्र एम एच २० एफ बी ४०३९ ने बजाजनगर येथील शाळेत सोडत असताना प्रताप चौकात येताच रांजणगाव शेपू कडून विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी क्र एम एच २० इ डब्लू ४१०३ या दोन्ही दुचाकीची एकमेकांना धक्का लागला, यात पालक घुगे व दुचाकीवरील चंदू कांबळे यांच्यात बाचाबाची झाली. कांबळे या तरुणाने आपल्या दोन मित्रांना बोलावून घेत रतन घुगे यांना त्याच्या दोन मुलांसमोर बेदम मारहाण केली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात चंदू कांबळे व त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.

****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!