न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

छत्रपती संभाजीनगर : बजाज नगर परिसरातील कला, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या बजाज नगर सांस्कृतिक मंचाचा उद्घाटन सोहळा आणि दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गायक मंगेश सोळुंके यांच्या स्वरधारा ऑर्केस्ट्राने सादर केलेल्या भक्तिगीतांनी आणि सुमधुर दिवाळी पहाट गीतांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. सुरेल संगीताच्या मैफलीत उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक मंचाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गरुड झेप अकॅडमीचे सर्वेसर्वा साहेबराव दादा सोनवणे, चंद्रकला (आई) सोनवणे, दामोदर घुगे, अनिल पाटील, अग्रवाल साहेब, कैलास चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्य कैलास भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला मंचाचे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. निलेश सोनवणे, भाजपा जिल्हा सचिव व सहकार्याध्यक्ष राजेंद्र अवतारे, भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सांभाळकर, भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष गणेश आव्हाड, भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब घुगे, भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी शत्रुघ्न देशमुख, भाजपा सरचिटणीस आसाराम करपे आणि पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

स्थानिक कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

बजाज नगर सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून परिसरातील कला, संस्कृती, साहित्य आणि विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विशेषतः नवोदित कलाकार आणि तरुणांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मंचाचा मानस असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. निलेश सोनवणे यांनी यावेळी सांगितले. सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि परिसरातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंचाचे अध्यक्ष आशिष धुमाळ, कार्याध्यक्ष जालिंदर सोनवणे, उपाध्यक्ष नागेश सातपल्ले व मंगेश देशमुख, सचिव अक्षय शिंदे यांच्यासह भगवान गायकवाड, भगवान गुंजकर, जगन्नाथ बोडके, शिवाजी आव्हाड, गणेश कोलते, रामेश्वर चौधरी, अजिंक्य मानकर, लक्ष्मण बहिर, किरण पन्हाळे, पांडुरंग चव्हाण आणि माधव देशमुख यांनी परिश्रम घेतले.

महिला पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्षा अंजली देशमुख, सचिव मीराताई सोनवणे, उपाध्यक्षा सुनीता अहिरे, नंदा राजपूत, सुनंदा जाधव, सविता हिरे, माधुरी भळगट, शोभा अडसुळे, डॉ. अपूर्वा पवार, सोनाली सोनवणे, शोभाताई अवतारे, भाग्यश्री जाधव आणि वर्षा रामफळे यांनी सहभाग नोंदविला. तसेच पंचायत समिती सदस्या रत्नमाला ढमढेरे आणि माजी सभापती ज्योती गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.

जनसेवा फाउंडेशन आणि बजाज नगर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सोहळा आणि दिवाळी पहाट कार्यक्रमाला परिसरातील विविध सामाजिक व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सांस्कृतिक मंचाच्या या नव्या उपक्रमामुळे बजाज नगरच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

~~~~~