
वाळूज महानगर : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना बजाजनगर येथील गणपती मंदिर परिसरात घडली. बजाजनगरमध्ये २५ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मिरवणूक पाहण्यासाठी गणपती मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास दिक्षा विशाल मस्के, रा. वडगाव कोल्हाटी या कुटुंबासह मिरवणूक पाहत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन ग्रॅम वजनाच्या मंगळसूत्रातील दोन सोन्याच्या वाट्या चोरट्यांनी लंपास केल्या.
मंगळसूत्र गळ्यातून ओढले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. मात्र, काही वेळाने पाहिले असता मंगळसूत्रातील दोन वाट्या गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे त्यांच्या साडीमध्ये ब्लेडचे पाते आढळून आल्याने चोरट्यांनी ब्लेडच्या साहाय्याने मंगळसूत्र कापल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत सुमारे ४५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी पोलिसांकडून मोठे स्टेज उभारण्यात आले होते. तसेच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली. या प्रकरणी विशाल मस्के हे तक्रार दाखल करण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
॰॰॰॰
-
डीजेमुक्त बजाजनगरमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप; आकर्षक देखाव्यांसह विसर्जन मिरवणूक
Share Total Views: 3 वाळूज महानगर : दरवर्षीच्या तुलनेत यंदा बजाजनगरातील गणपती विसर्जन मिरवणुकित डीजेचा
-
विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा सोन्याच्या दागिन्यांवर डोळा; बजाजनगरमध्ये महिलेचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 29 वाळूज महानगर : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील
-
मे. दादा डेअरीचा परवाना निलंबित; तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळल्याने कारवाई
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा परभणी : काळी कमानजवळ, वसमत रोड, परभणी येथील



