
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
वाळूज : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या ८ वर्षीय विद्यार्थिनीला भरधाव वाळूच्या हायवाने धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी वाळूज महानगरातील विटावा–एकलहेरा रस्त्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरुषी कृष्णा तिवारी (वय ८) ही शाळा सुटल्यानंतर बसमधून उतरून रस्ता ओलांडत होती. याचवेळी वाळूने भरलेल्या भरधाव हायवाने तिला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आरुषीचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. तिची १६ वर्षीय बहीण नंदनी तिवारी हिलाही या अपघातात दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी हायवाची तोडफोड केली. दरम्यान, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.
या प्रकरणाचा तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करत असून, पसार झालेल्या हायवा चालकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवजड वाहनांच्या वेगावर आणि वाहतुकीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-
उपळी येथे ग्रामपंचायतीचे सामाजिक सभागृह सील; पुन्हा ग्रामपंचायतीच्या ताब्यात
-
वेरुळमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; शेकडो नागरिकांच्या समस्या जागीच निकाली
-
पाणी प्रश्नावर ठाकरे गटाचे आंदोलन; वाळूजमध्ये २१ जणांसह ८० ते १०० आंदोलनकर्त्यांवर गुन्हा
