
न्युज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट ब्रँडेड इंडक्शन कुकटॉप्सची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी छापेमारी करून ‘SURYA’ कंपनीच्या नावाने बनावट लेबल लावलेली इंडक्शन कुकटॉप्स, रिकामे कार्टन बॉक्स तसेच व्यावसायिक कागदपत्रे जप्त केली.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी नोंद करण्यात आला असून आरोपी सोहेल नाजीर खान (वय 23, रा. साजापूर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आशिष राज (वय 26, रा. पूर्वी चंपारण, बिहार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने ‘SURYA’ कंपनीच्या नावासारखे बनावट लेबल तयार करून कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट उत्पादने विक्रीसाठी ठेवली होती.
दि. 23 एप्रिल रोजी दुपारी साजापूर येथील दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी चार कार्टनमध्ये 24 इंडक्शन कुकटॉप्स, दोन सैल कुकटॉप्स, 18 रिकामे कार्टन बॉक्स, एक रजिस्टर, दोन बिल पुस्तके, एक नोटबुक व इनव्हॉइसच्या प्रती जप्त करण्यात आल्या.
जप्त केलेल्या एकूण 26 उत्पादनांची अंदाजे किंमत रु. 65 हजार ते 78 हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि प्रवीण पाथरकर करीत आहेत.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
