Screenshot
४.७० लाखांचा ऐवज गायब

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी परिसरात धाडसी चोरीची घटना उघडकीस आली असून चंदनशील कास्टिंग कंपनीच्या बाजूने तब्बल १ हजार किलो कॉपर चोरीला गेल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास गट क्रमांक ७७९, चंदनशील कास्टिंग कंपनीच्या बाजूला, जोगेश्वरी (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली. अज्ञात आरोपींनी संधी साधून कंपनी परिसरातून कॉपरचा मोठा साठा चोरून नेला.
चोरीला गेलेल्या मालामध्ये ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे १ हजार किलो वजनाचे कॉपर असल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रति किलो ४७० रुपये दराने या मालाची किंमत ठरविण्यात आली आहे.
या प्रकरणी शाम नथ्थूलाल चौधरी (वय ५५, रा. केसरसिंगपुरा, संभाजीनगर) यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
