Screenshot

छत्रपती संभाजीनगर (वाळूज MIDC) : 112 आपत्कालीन सेवेवर फोन करून मारहाण व गोळीबार झाल्याची खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 एप्रिलच्या रात्री घडली असून 5 एप्रिल रोजी याबाबत अधिकृत फिर्याद नोंदवण्यात आली.
फिर्यादी प्रकाश गणपत वाघ (वय 42, रा. संभाजीनगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 12.30 वाजता 112 वरून संदेश मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने दिलेल्या ठिकाणी जाऊन पडताळणी केली. मात्र घटनास्थळी कोणतीही मारहाण किंवा गोळीबार झाल्याचे आढळले नाही. पुढील तपासात कॉल करणाऱ्यांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी सोनू उर्फ पुष्पक सोमनाथ जाधव (वय 24) आणि त्याचा मित्र अमोल बबन गाणगर (वय 35, रा. मुंडेश्वरवाडी, ता. गंगापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 212, 217, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आपत्कालीन सेवेचा गैरवापर करून खोटी माहिती देणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे पोलिस यंत्रणेचा वेळ व साधनांचा अपव्यय होतो. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
॰॰॰॰
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 3 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
-
ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 5 Share
-
कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) गंगापूर तालुका | १२ जुलै २०२५

