गंगापूर शहरा नजीकच्या हॉटेल विराजवळील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा: (गोकुळ लाडे)
गंगापूर- छत्रपती संभाजीनगर रोडवरील हॉटेल विराज नजिक परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या दुचाकी तसेच अज्ञात वाहनाच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला झाला आहे.
याअपघाताची माहिती मिळताच मोरया रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, जिल्हा परिषद सदस्य वाल्मीक शिरसाठ, कृष्णा चव्हाण,अमोल पाटील,मंगेश खाजेकर, सोनू भैया यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना प्राथमिक उपचारासाठी गंगापूर येथील रुग्णालयात दाखल केले.या वेळी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अजय शिवाजी काळे ( वय २० रा. शेंदुरवादा) यांना मृत घोषित केले. तर रोहित सोमनाथ रांजणे हे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू गंगापूर पोलिसांकडून सुरू आहे.
____________________
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले

Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी
