WALUJ PS

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ):

छत्रपती संभाजीनगर : बिडकीन अर्बन मल्टिपर्पज निधी लिमिटेड या संस्थेत गुंतवणूक केलेल्या ३७ ठेवीदारांची सुमारे ७० लाख ३१ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ठेवीदारांनी जमा केलेली रक्कम मुदत संपल्यानंतरही परत न मिळाल्याने अखेर वाळूज पोलीस ठाण्यात संबंधित संस्थेचे संचालक आणि शाखा व्यवस्थापकासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरातील ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या एफआयआरमधील माहितीनुसार, नारायण विठ्ठल हाडोळे (वय ३१, रा. घामोरी, ता. गंगापूर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. बिडकीन अर्बन मल्टिपर्पज निधी लिमिटेडच्या बिडकीन शाखेत तसेच शेंदुरवादा येथील शाखेत त्यांनी आणि इतर ठेवीदारांनी बचत खाते व पिग्मी खात्यांमध्ये पैसे जमा केले होते.

तक्रारीनुसार, १३ फेब्रुवारी २०२३ पासून ४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संबंधित संस्थेत ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, स्वतःच्या खात्यातील रक्कम तसेच इतर ३७ गुंतवणूकदारांची मिळून एकूण ७० लाख ३१ हजार ४०० रुपयांची गुंतवणूक झाली होती. सप्टेंबर २०२५ मध्ये पैशांची आवश्यकता असल्याने तक्रारदाराने संस्थेकडे जमा केलेली रक्कम परत मागितली. मात्र, संस्थेकडून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर अनेक वेळा शाखेत जाऊन पैशांची मागणी केली असता, पैसे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तक्रारीनुसार, संस्थेच्या संबंधित शाखेतील व्यवस्थापक आणि संचालकांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे आपली आणि इतर ठेवीदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली. या प्रकरणात एफआयआरमध्ये संस्थेचे संचालक स्वप्नील शिरीष देशमुख, शिरीष सुधाकरराव देशमुख, विकास कुणवरराव गोर्डे आणि शाखा व्यवस्थापक योगेश राजाराम निकम यांच्यासह अन्य एका अज्ञात व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे.

वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.५८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात ३७ ठेवीदारांची एकूण ७० लाख ३१ हजार ४०० रुपयांची रक्कम अडकल्याचा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला असून, संबंधित प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. ठेवीदारांची रक्कम परत मिळणार का आणि या प्रकरणात आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याकडे आता ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.


  • बिडकीन अर्बन मल्टिपर्पज निधी संस्थेत ७० लाखांचा आर्थिक अपहार? ३७ ठेवीदारांची फसवणूक झाल्याची तक्रार; वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल

    बिडकीन अर्बन मल्टिपर्पज निधी संस्थेत ७० लाखांचा आर्थिक अपहार? ३७ ठेवीदारांची फसवणूक झाल्याची तक्रार; वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल

    Share       Total Views: 2न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ): छत्रपती संभाजीनगर : बिडकीन अर्बन मल्टिपर्पज निधी लिमिटेड या संस्थेत गुंतवणूक केलेल्या ३७ ठेवीदारांची सुमारे ७० लाख ३१ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ठेवीदारांनी जमा केलेली रक्कम मुदत संपल्यानंतरही परत न मिळाल्याने अखेर वाळूज पोलीस ठाण्यात संबंधित संस्थेचे संचालक…

  • ऑर्चिड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेशाची संधी!

    ऑर्चिड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेशाची संधी!

    Share       Total Views: 20🌸 शुभ दीपावली! शिक्षण आजचे… उज्ज्वल भविष्य उद्याचे! Orchid Group of Institutions यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, निवासी कॅम्पस आणि स्पोर्ट्स अकॅडमी अशा विविध शैक्षणिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध. 📚 शैक्षणिक सुविधा : 📍 पत्ता: CIDCO महानगर-१, छत्रपती संभाजीनगर. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क :73878 6882873875 17747 🌐 www.orchidinstitutions.com…

  • साई हॉस्पिटलतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

    साई हॉस्पिटलतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

    Share       Total Views: 14दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! डॉ. अमर कोडगिरेएम.बी.बी.एस., डीसीएच (मुंबई)बालरोग तज्ज्ञ व नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. सारिका कोडगिरेएम.एस., डी.जी.ओ. (पुणे)स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ साई हॉस्पिटलबालरुग्णालय, प्रसूतिगृह व मल्टिस्पेशालिटीप्रताप चौक, बाजाजनगर छत्रपती संभाजीनगर. आपणास व आपल्या संपूर्ण कुटुंबास सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाची…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *